भीतीच्या गडद छायेनं हसऱ्या भिंतीआड आडोसा शोधला
‘रोंगे, याचा अर्थ आहे, इथं पोलीस ठाणंच भीतीच्या छायेखाली आहे. त्याला बाहेरच्या जनतेची काळजी आहे, तशी या भिंतींच्या आत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही! अन् तुम्ही एक गोष्ट विसरू नका, सत्कारापेक्षा जिवाचं मोल नेहमीच मोठे असते. इथं जनतेचा विश्वास पोलिसांवर नव्हे, तर त्यांच्यावर आहे. त्यापाठीमागे त्यांच्या बंदुकीची दहशत असेल किंवा त्यांना ते आपल्या विवंचना दूर करतील असं वाटत असावं.’.......